संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदचे सदस्य २ दिवसा साठी पाकिस्तानला जाणार आहेत. यूएनएससी प्रतिबंध समिती २५ आणि २६ जानेवारीला पाकिस्ताननी केलेल्या सर्व दाव्यांना पडताळून पाहणार आहे.दहशतवादी हाफिज सईद आणि त्यांच्याशी संबंधित संघटनावर पूर्णपणे बंदी घालण्यात पाकिस्तान अयशस्वी राहिला. यानंतर भारत आणि अमेरिकेने दबावा टाकला आणि आता संयुक्त राष्ट्राच्या सदस्यांची एक टीम पाकिस्तानला याबाबत चौकशी करण्या साठी जाणार आहे.हाफिज सईदला २००८ मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावात दहशतवादी घोषित करण्यात आलं होतं. अमेरिकेने जून २०१४ मध्ये लश्कर-ए-तैयबाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं होतं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews